धक्कादायक सर्व्हे: हसन मुश्रीफांची कागल सीट धोक्यात?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रदीर्घ आमदार असणारे हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्यासोबत मंत्रीमंडळात दाखल झाले.
कोल्हापूर हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा पुरोगामी जिल्हा. या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली साथ दिली.
आश्चर्य म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचे शिष्य असणाऱ्या हसन मुश्रीफ यांनाही कागल विधानसभा मतदारसंघातून अनेकदा संधी मिळाली.
अल्पसंख्याक समाजातील असूनही कागल तालुक्यातील जनतेने त्यांना अनेकदा संधी दिली.
मात्र यावेळी त्यांना राजे समरजीत घाटगे यांनी आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्यावर कळस म्हणजे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर अनेकदा आरोप केले आहेत. त्यानंतर अनेकदा ED च्या धाडी मुश्रीफांवर पडल्या असून काही गैरव्यवहार आहेत का याची तपासणी करत आहेत.
राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर अनेकांनी मुश्रीफांवर नाराजी व्यक्त केली. तर राजे समरजीत सिंह घाटगे यांनी जाहीर सभा घेऊन आपण मुश्रीफांविरूद्ध लढणारच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजे गटात उत्साहाचे वातावरण आहे.
अशातच आज सकाळी एका खाजगी वृत्त वाहिनीच्या माध्यमातून एक सर्व्हे करण्यात आला, हा सर्व्हे फक्त दहा तासांचा आहे. त्यामध्ये सुमारे २५ हजार लोकांनी आपले मत नोंदवले आहे.
त्यातील ७४% मते हि समरजितसिंह घाटगे यांना मिळाली आहेत, तर हसन मुश्रीफ यांना फक्त २६% लोकांनी पसंती दर्शवली आहे.
म्हणजेच
समरजीत घाटगे १८,५००
तर मुश्रीफ यांना फक्त ६,५०० लोकांनी पसंती दर्शवली आहे .
कालच्या कोल्हापूर मधील भव्यदिव्य स्वागतानंतर हा सर्व्हे मुश्रीफांसाठी धक्कादायक असून राजे गटासाठी उत्साह वाढविणारा आहे.






Comments
Post a Comment