शरद पवारांनी मागितली माफी?
शरद पवारांनी मागितली माफी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर आज नाशिक जिल्ह्यातील येवला या छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली.
या सभेत त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याला आज काही दिवस उलटून गेले अजित पवार यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांचे सोबत गेले.
त्यानंतर शरद पवारांनी आज अखेर येवल्यात पहिली जाहीर सभा घेतली या सभेसाठी सुप्रिया सुळे,जितेंद्र आव्हाड , जयंत पाटील , रोहित पवार, अमोल कोल्हे आदी मंडळी उपस्थित होती.
परवाच भुजबळ नॉलेज सिटी मुंबई येथे झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
त्यामुळे लोकांच्या उत्सुकता होती की आज शरद पवार काय बोलणार ?
थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली या सभेत शरद पवार यांनी येवला तालुक्यातील जनतेची जाहीर माफी मागितली.
यापूर्वी सातारा येथील पावसात जी सभा झाली त्या सभेत ही शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागितली होती.
या वादळी सभेनंतर छत्रपती उदयनराजे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी पवारांचे जुने मित्र श्री श्रीनिवास पाटील हे मोठ्या मताधिक्याने खासदार झाले होते.
हाच फॉर्मुला आज शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात येवला येथे जी सभा पार पडली त्या सभेत वापरला ते म्हणाले, " माणसाकडून जर चूक झाली तर त्याची माफी मागितली पाहिजे. मी आपली जाहीर माफी मागतो.
मी उमेदवार निवडायला चुकलो.
आता ही चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे आपण सर्व मिळून मिळून ही चूक दुरुस्त करत करूया!"
शरद पवारांचे हे भाषण येवलावासीय आता किती मनावर घेतात हे येणारा काळ सांगेल!




Comments
Post a Comment