Posts

Showing posts from July, 2023

धक्कादायक सर्व्हे: हसन मुश्रीफांची कागल सीट धोक्यात?

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रदीर्घ आमदार असणारे हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्यासोबत मंत्रीमंडळात दाखल झाले.  कोल्हापूर हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा पुरोगामी जिल्हा. या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली साथ दिली.  आश्चर्य म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचे शिष्य असणाऱ्या हसन मुश्रीफ यांनाही कागल विधानसभा मतदारसंघातून अनेकदा संधी मिळाली.  अल्पसंख्याक समाजातील असूनही कागल तालुक्यातील जनतेने त्यांना अनेकदा संधी दिली.  मात्र यावेळी त्यांना राजे समरजीत घाटगे यांनी आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  त्यावर कळस म्हणजे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर अनेकदा आरोप केले आहेत. त्यानंतर अनेकदा ED च्या धाडी मुश्रीफांवर पडल्या असून काही गैरव्यवहार आहेत का याची तपासणी करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर अनेकांनी मुश्रीफांवर नाराजी व्यक्त केली. तर राजे समरजीत सिंह घाटगे यांनी जाहीर सभा घेऊन आपण मुश्रीफांविरूद्ध लढणारच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजे गटात उत्साहाचे वातावरण...

शरद पवारांनी मागितली माफी?

Image
 शरद पवारांनी मागितली माफी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर आज नाशिक जिल्ह्यातील येवला या छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली.  या सभेत त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याला आज काही दिवस उलटून गेले अजित पवार यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांचे सोबत गेले. त्यानंतर शरद पवारांनी आज अखेर येवल्यात पहिली जाहीर सभा घेतली या सभेसाठी सुप्रिया सुळे,जितेंद्र आव्हाड , जयंत पाटील , रोहित पवार, अमोल कोल्हे आदी मंडळी उपस्थित होती. परवाच भुजबळ नॉलेज सिटी मुंबई येथे झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.  त्यामुळे लोकांच्या उत्सुकता होती की आज शरद पवार काय बोलणार ? थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली या सभेत शरद पवार यांनी येवला तालुक्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. यापूर्वी सातारा येथील पावसात जी सभा झाली त्या सभेत ही शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागितली होती. या वादळी सभेनंतर छत्रपती उदयनराजे यांचा पराभव झाला होता. त्...